2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी
भाऊबीजेची सुट्टी देण्याचा निर्णय
राज्य सरकारनं पहिल्यांदा जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र, त्यानंतर पुन्हा पत्रक काढून त्याचा समावेश केल्याचं सांगण्यात आलं. शासकीय कर्मचाऱ्यांना 2025 मिळणार भाऊबीजेची सुट्टी मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर राज्य सरकारने भाऊबीजेची सुट्टी जाहीर केली आहे. सरकार कडून लाडकी बहीण आणि लाडक्या भावाला सुट्टीचे गिफ्ट देण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये विशेष उल्लेख करत अतिरिक्त सुट्टी जाहीर देण्यात आली आहे. दरवर्षी मिळणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये अधिक एका सार्वजनिक सुट्टीची भर पडली आहे.
2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी
लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरु केली होती. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या निमित्तानं राज्यातील अर्जदार महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दरमहा 1500 रुपयांप्रमाणं तीन हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे देण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत महिलांना 7500 रुपये मिळाले असून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.